इतर नेते मंडळींना याचा विसर,  गर्दी जमवून, मास्क काढून केले जातेय फोटोसेशन.

लोकप्रतिनिधींकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम इतरांना सांगण्यापुरतेच मर्यादित?

 

पुणे, दि.१०( punetoday9news):- सातारा येथे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभे असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर  कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य आपण करत आहोत. असे मुख्यमंत्री  म्हणाले

तसेच  कोविडची लस येईपर्यंत आपण मास्क वापरणे, हात धुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून कोविडच्या प्रादुर्भावापासून स्वत:ला दूर ठेवूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी व इतर जबाबदार प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी यांनी वारंवार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या साठी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लाखो रूपये जाहिरातीसाठीही खर्च केले आहेत. आणि आता खुद्द या राजकारण्यांनाच या गोष्टीचा विसर पडला काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.  कारण काही राजकारणी मंडळी अनेक कार्यक्रम घेत असताना या नियमांची पायमल्ली होत असल्याची बाब समोर येत आहे. ना मास्क, ना सॅनिटाइजेशन इतकेच काय तर फोटोसेशन साठी अगदी खांद्याला खांदा लावून उभे राहिले जात आहे.  यात कदाचित राजकीय मंडळी हे विसरले असावेत की एकदा टेस्ट निगेटीव्ह आली म्हणजे पुन्हा कोरोना होत नाही असे नाही त्यामुळे स्वतःबरोबर हे कार्यकर्ते इतरांना ही संकटात टाकत आहेत. 

आता कुठे कोरोना रूग्णांच्या आकडेवारीचा आलेख खाली येवू लागला असताना असे उद्योग करून आपण कोरोना वाढवण्याची व्यवस्था तर करत नाही ना याचेही भान ठेवणे गरजेचे आहे.

काल पुण्यातील एका कार्यक्रमात एका अधिकाऱ्याने मास्क काढून बोलण्याचा प्रयत्न करताच उपमुख्यमंत्र्यांनी मास्क लावण्यास सांगितले.  मात्र इतर नेते मंडळींना हे कधी सुचणार हा प्रश्नच आहे. फोटो महत्त्वाचा की जीव याचाही विचार आता करावाच लागेल.

 

Comments are closed

error: Content is protected !!