पिंपरी, दि. १०(punetoday9news):- शिवसेनेचे खेड-आळंदी विधानसभेचे माजी व प्रथम आमदार सुरेश गोरे (वय ५७) यांचे आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.

सुरेश गोरे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर मागील २  दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या लढाईत आज त्यांना अपयश आले. त्यांच्या शांत, मनमिळाऊ व संयमी स्वभावामुळे त्यांनी राजकारण व समाजकारणात वेगळं ठसा उमटवला होता.  तालुक्यात सुरेश गोरे यांनी भाऊ या नावाने आपली ओळख निर्माण केली होती.

सुरेश गोरे यांच्या मागे, आई, पत्नी १ मुलगा,मुलगी भाऊ बहीण चुलते, पुतणे असा मोठा आणि एकत्रित कुटुंब असेला मोठा परिवार आहे. सेनेच्या सर्वच नेत्यांमध्ये सुरेशभाऊंच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!