पिंपरी, दि. १०( punetoday9news):- ऑक्टोबर सर्व्हिस मध्ये डिस्ट्रीक्ट 3234 D2 शैक्षणिक विभागातर्फे विविध विषयातील आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रोजेक्ट राबविण्यात येणार असुन यामध्ये पुणे जिल्हातील प्रत्येक तालुक्यात अवकाशनिरीक्षण केंद्र काढणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे डाॅ. प्रसाद खंडागळे यांनी दिली.
जेजुरी नंतर दुसरे केंद्र शिरगांव मावळ येथील शारदाश्रम शाळेत होणार आहे. यासाठी हेन्कल इंडिया कंपनीने सी एस आर फंड दिला आहे. लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय शास्त्री यांच्या हस्ते एक लाख रुपयांचे टेलिस्कोप व इतर साहित्य शारदाश्रम विघालयाचे शिक्षक कापरे व संतोष चव्हाण यांना सुपुर्त करण्यात आले.
दुस-या उपक्रमात पुण्यातील प्रसिद्ध अशा गांधर्व महाविलायात ग्रामीण भागातील संगीत शिकणाऱ्या शिक्षकांसाठी मदत करणार असुन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच शाळेत शिकवुण आत्मनिर्भर व्हायचे आहे. याप्रसंगी गांधर्व महाविलयाचे प्राचार्य प्रमोद मराठे यांनी आर्थिक मदतीचा चेक स्वीकारला.तिस-या उपक्रमात अनेक गरीब मुलींना आर्थिक निधी अभावी राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचता येत नाही. यासाठी पुणे येथील महाराष्ट्र मंडळातील तसेच नाशिक, अहमदनगर येथील मुलींना कीट, बुुुट तसेच शारीरीक तंदुुरुस्तीसाठी साहित्य व खुराक देण्यात येणार आहे.
याप्रसंगी पल्लवी गुडसे या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूस कीट देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक राजेंद्र कदम उपस्थित होते.
चौथ्या उपक्रमात आदिवासी इंजीनिअरिंग मुलांना ५ लॅपटाॅप व पुण्यातील गरीब विघार्थाना लॅपटाॅप देण्यात आले. सिध्देश जाधव याने याचा स्वीकार केला. ग्रामीण भागातील मुलांना लॅपटाॅप, ई लर्निग सुविधा देणार असल्याचे सांगण्यात आले.
पाचव्या उपक्रमात पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्हातील मुलींसाठी आर्मी नेव्ही भरतीसाठी मोफत मार्गदर्शन व ट्रेनिंग देणार असल्याचे सांगण्यात आले. यातुन मुली आत्मनिर्भर होतील.
सहाव्या उपक्रमात गरीब कुटुंबातील मुलींचा शैक्षणिक खर्च विविध लायन्स क्लब करणार आहे. याची सुरवात कटारिया हायस्कुल येथील वस्तीत राहणा-या दहा मुलींचा शैक्षणिक खर्चाचा चेक शिक्षक वाघ यांना देऊन करण्यात आला.
तर सातव्या उपक्रमात वेदातील सायन्स या विषयी अनेक उपक्रम लाॅकडाऊन उठल्यानंतर करण्यात येणार आहेत.
या प्रसंगी लायन्स शैक्षणिक विभाग प्रमुख यांनी ग्लोबल मिशन संस्थेशी सहकार्य करुन जिल्हामध्ये ५ ठिकाणी अशी अवकाश केंद्र काढली जाणार असल्याची माहिती डाॅ प्रसाद खंडागळे यांनी दिली. यातुन भविष्यात संशोधक बनवुन आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
प्रांतपाल अभय शास्त्री यांनी याप्रसंगी या उपक्रमांचे कौतुक करुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील एका अवकाशदर्शन शाळेच्या खर्चाची घोषणा केली.
लायन्स ग्रामीण शैक्षणीक विभाग प्रमुख लायन प्रकाश नारके, लायन विलास काळे, डाॅ विशाल कुंभारे. गांधर्व महाविलाय प्राचार्य पंडित प्रमोद मराठे , सहकारगरचे अध्यक्ष ला. प्रताप शिंदे, नंदु जाधव व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed