समितीच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांचा सन्मान .
पिंपरी, दि. १० चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अप्पर तहसील कार्यालय येथे संजय गांधी योजना समितीचे कार्यालय सुरू करण्यात आले.
३२ वर्षांपासून दिव्यांग, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना स्वारगेट येथे खडक माळ आळी तहसील कार्यालय मध्ये जावे लागत होते. चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालया मध्ये सुरू करण्यात आले. या बद्दल त्यांचा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
त्यावेळी चिंचवड मतदारसंघाचे संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, संजय गांधी योजना समितीचे सदस्य संजय मराठे, राजेंद्र पाटील, आदिती निकम, दिलीप गडदे , सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर व दीपक जाधव उपस्थित होते.
Comments are closed