मुंबई, दि. ११( punetoday9news):- मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात रब्बरवाला हाऊस इथे गुप्त बैठक झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. पण आता रात्री झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकल सुरू करण्याचा मुद्दा असो, वाढीव वीजबिलावरोधात असो किंवा भूमीपुत्रांची भरती असो. या सगळ्यावर मनसेनं तीव्र भूमिका घेत तात्काळ बदल करण्याची मागणी सरकारकडे केली.
शनिवारी मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला वाढीव वीजबिल विरोधात निवेदन दिले होते. या निवेदनात जर येत्या १५ दिवसात लाईट बिल कमी केले नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे.
टपाल वाहन सेवेत होत असणाऱ्या रिक्त जागांच्या भरतीत स्थानिक मराठी भूमीपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावे, यासाठी मनसेकडून सर्व प्रथम हात जोडून विनंती अर्ज करण्यात आला.
Comments are closed