पिंपरी, दि. ( punetoday9news):- ई-मेल बहुतांश लोकांना वापरावा लागतो. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपणास त्याची गरज पडतेच. आज ऑनलाईन व्यवहारात तर सर्वत्र गरजेचा अत्यावश्यक भाग म्हणून ईमेल चा वापर होतो. पण यातील काही बारकावे आपणास माहित आहे का? तर जाणून घेऊया त्या विषयी. इलेक्ट्रॉनिक मेल म्हमजेच ई-मेल पाठवताना स्क्रिनवर दिसणारे To, Cc, Bcc यांचे ‘हे’ आहेत अर्थ-
To: ज्याला ई-मेल करायचा आहे त्याचा ई-मेल आय डी येथे लिहावा.
येथे तुम्ही एका ई-मेल ॲड्रेस स्वल्पविराम देऊन एकापेक्षा जास्त मेल आयडीची यादी देऊन एकच मेल एका वेळी अनेकांना पाठवू शकता.
Cc (Carbon Copy): कार्बन कॉपी म्हणजे म्हणजे तोच ई-मेल अन्य कोणाला पाठवायचा असेल तर येथे स्वल्पविराम ( , ) देऊन त्यांचे ई-मेल आयडी लिहावा. या लिहिलेल्या ई-मेल आयडीची यादी यातील प्रत्येकाला दिसेल, ज्यांना तुम्ही हा मेल पाठवला असेल.
Bcc (Blind Carbon Copy): जर मेल पाठवणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला ही ई-मेल आय डी ची यादी दिसू नये असे वाटत असेल तर ती यादी स्वल्पविराम देऊन वेगळी करत येथे लिहावी.
तर जाणून घेऊया तुमच्या स्मार्टफोन वरून ईमेल कसा पाठवावा . शुभम रघावंत याच्या खालील विडिओ मधून त्यासाठी खालील लिंक/विडिओ वर क्लिक करा.
Comments are closed