पिंपरी, दि. १२ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. आजच्या युगातही टपाल खात्याचे महत्व टिकून आहे. जागतिक टपाल दिन हा खरेतर टपाल विभागाचे अधिकारी आणि पोस्टमन यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे.
तीनही ऋतूत अविरतपणे सेवा देण्याचे कार्य टपाल खाते करत असते. करोना च्या काळात व संपूर्ण लाॅकडाऊन मध्येही घरोघरी जाऊन त्यांनी जनतेची सेवा चालू ठेवली. याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात टपाल कार्यलयातील कर्मचारी विवेक महादेव दोके यांचा सन्मान भारतीय पायदळाचे कार्यरत सैनिक राजेश भडकवाड यांच्या हस्ते करोना योध्दा प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यावेळी रमेशदादा बागवे प्रतिष्ठान चे अध्यक्ष शेषराव कसबे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले तर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे प्रास्ताविक केले .
Comments are closed