पुणे, दि.१३ (punetoday9news):- तरुण मुलींसोबत डेटिंगचे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील एका ६८ वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांनी चांगलाच गंडा घातला आहे. 

एकटे आहात? काही गोष्टी शेअर करायच्या आहेत? असे विचारत नंबर शेअर करून गोड बोलून या आजोबांना लुटण्यात आले आहे.

मुली पुरवण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी या आजोबांकडून तब्बल पावणे चार लाख रुपये लुबाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या आजोबांनी सायबर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे.

पुणे पोलिसांच्या वतीने वारंवार सांगुणही थोड्या लोभापाई नागरिक स्वतःची फसवणूक करून घेताना दिसतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कसल्याही मेसेज मधील अमिशाला बळी न पडता सुरक्षित राहणे गरजेचे आहे.

Comments are closed

error: Content is protected !!