नाशिक, दि. १४( punetoday9news):- महाराष्ट्रभर परतीच्या वादळी पावसाने थैमान घातला आहे.कुठलाच जिल्हा या वादळातून वाचला नाही.हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांची पिकं संपूर्ण नष्ठ झाली.कोरोनात घायाळ झालेल्या शेतकऱ्यांवर हा पुन्हा मोठा आघात आहे.म्हणून आज सरकारने वेळकाढू पंचनाम्यांचे रीतिरिवाज न पाळता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करून त्यांना आधार देण्याची गरज आहे.यासाठी सरकारने स्वतःच्या अंतःकरणाचे दार खुलं करणं गरजेचं आहे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.
संपूर्ण राज्यात सगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सगळ्याच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पंचनामे करण्यात आता वेळ दवडू नाही.तर सरसगट पंचनामे गृहीत धरून मदत द्यावी. यासाठी मागील वर्षी अवकाळी , महापूर व इतर सरकारी योजनांसाठी संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती व बँकेचे खाते क्रमांक शासनाने जमा केले आहे.त्यातच थोडी फार गरज असल्यास दुरुस्ती करून ही मदत तात्काळ देणं शासनाला शक्य आहे.
केवळ महाराष्ट्र नाही तर या चक्री वादळाचा फटका साधारण पाच ते सहा राज्यांना बसतोय म्हणून केंद्राने सुद्धा राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती जाहीर करून विशेष पॅकेज द्वारे शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे.केंद्र आणि राज्य शासनाने या विषयातील गांभीर्य समजून घेतलं नाही तर अनेक शेतकरी कुटुंब उध्वस्त होतील अशी भीती देखील संदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed