मुंबई, दि. १४ (punetoday9news):- राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच ट्वीट करून ही शक्यता व्यक्त केली आहे.

“सोमवारी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असे नितीन राऊत यांनी ट्वीट केले आहे.

एक लाईन वरून दुसऱ्या लाईनवर वीज पुरवठा शिफ्ट होताना ट्रिपिंग होत नाही. एकाच वेळी दोन्ही लाईन डाऊन झाल्या त्यामुळे ऊर्जा खात्याला घातपाताचा संशय आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे .

मुंबई वीज पुरवठा खंडित याप्रकरणी चौकशी करण्यासाठी केंद्राची एक टेक्निकल टीम मुंबईत आलेली आहे. चौकशीनंतर ही टीम त्यांचा अहवाल देणार आहे.

तसेच राज्य सरकारसुद्धा एक टेक्निकल समिती नेमणार आहे, त्या समितीच्या अहवालानंतर पुढे काय कारवाई करायची हे ठरणार असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात सायबर अटॅकची शक्यताही उर्जामंत्र्यांनी नाकारलेली नाही.

 

जाहिरात ? ऑफिस भाड्याने देणे आहे. पिंपरी. 9226894207

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!