पिंपरी, दि. 14( punetoday9news):- ॲपलने आपल्या हाय स्पीड इव्हेंटमध्ये आयफोन 12 सीरिजचे 4 फोन लॉंच केले आहेत.

आयफोन 12 सीरिजमधील ‘या’ सर्व फोन्समध्ये 5G सपोर्ट मिळणार- आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो, आयफोन 12 प्रो मॅक्स.

आयफोन 12 सीरिज 6 कलर व्हेरियंट्स, एचडीआर 10 सपोर्ट, वायरलेस चार्जिंग, ड्युअल सिम सपोर्टसह आला आहे. फोनमध्ये दुसरे सिम ई-सिम असणार आहे. ए-14 बायोनिक प्रोसेसर आयफोन 12 मध्ये मिळणार आहे.

आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स-4 स्टेनलेस स्टील फिनिशमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये ग्रॅफाइट, सिल्वर, गोल्ड आणि पॅशनेट ब्लू यांचा समावेश आहे.

आयफोन 12 मध्ये 50 वॅटपर्यंत वायरलेस फास्ट चार्जिंगसाठी मॅगसेफ टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे, आयफोन 12 आणि ॲपल वॉच एकाच चार्जरने चार्ज करणं शक्य आहे.

आयफोन 12 च्या सर्व मॉडेलच्या कॅमेऱ्यामध्ये- अल्ट्रा वाईड मोड, नाइट मोडचे फिचर्स देण्यात आले आहेत. नाईट मोडमध्येही टाईम लॅप्स मिळणार आहेत.

आयफोन 12 प्रो मॉडेलला 30 मिनिटांपर्यंत 6 मीटरपर्यंत पाण्यात ठेवता येऊ शकतं. यात एक सर्जिकल मॅट ग्लाससोबत एक भव्य सर्जिकल-ग्रेड स्टेनलेस स्टील बँड जोडण्यात आलं आहे.

Advt:- ऑफिस भाड्याने देणे आहे. Prime location, pimpri 

 

Comments are closed

error: Content is protected !!