पिंपरी, दि. १४ (punetoday9news):- भारतीय व महाराष्ट्र राज्य हवामान विभाग यांनी पुढील ४ ते ५ दिवस माेठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
सर्तकतेचा इशारा:-
पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात रिमझीम पावसास सुरूवात झालेली असुन पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातुन केव्हाही पाण्याचा विसर्ग नदी पात्रात साेडावा लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पवना नदी तीरावरील सर्व गावातील,शहरातील नागरीकानी सर्तक रहावे. नदी तीराजवळील आपली वाहणे,पाणी उपसा पंम्प व इतर साधनसामुग्री सुरक्षित ठिकाणी हलवण्याची दक्षता घेण्यात यावी ,जेणे करुन कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही तसेच जलसंपदा विभागास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed