दिल्ली, 15( punetoday9news):- पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय झाले असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
याच अनुषंगाने STARS प्रोजेक्ट सरकारने तयार केला आहे. Strengthening teaching learning and result for states असा त्याचा अर्थ असल्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
या उपक्रमाचा उद्देश हा शिक्षणापासून काय शिकले हा असून यासाठी अनेक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने 6 राज्यात चालवले जाणार आहेत.
शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत STARS कार्यक्रम कार्यरत राहणार असून हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांचा यात समावेश असेल.
सदरील संपूर्ण प्रोजेक्टची किंमत हि 5,718 कोटी रुपये असून यासाठी जागतिक बँकेची 500 मिलियन डॉलर्सची मदत होणार असल्याचेही जावडेकर यांनी नमूद केले आहे.
Advt:- ऑफिस भाड्याने देणे आहे, prime location, pimpri.
Comments are closed