पुणे दि.१५ ( punetoday9news):-  पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रो स्टेशनच्या वॉटर टँक, फुट ओव्हर ब्रिजचे फुटिंग, स्टेअर केस व लिफ्टचे काम करण्यात येणार आहे.

या कामाच्या अनुषंगाने संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रोचे कामकाज पुर्ण होईपर्यंत करण्यात आलेल्या बदलानुसार किज हॉटेल, पिंपरी ते हॅरिस ब्रिज, दापोडी दरम्यान महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे वतीने सकाळी 11 ते सायं. 5 व रात्री 11 ते पहाटे  5 या वेळात काम करण्यात येणार असल्याने वाहतुक सर्व्हिस रोडने टप्प्याटप्प्याने वळविण्यात येणार आहे. या वेळात वाहतूक संथ गतीने चालणार आहे.
या वाहतुक बदलाबाबत मेट्रोचे कर्मचारी व वाहतुक कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर वाहतुक पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!