सांगवी, दि . १६ (punetoday9news ) :- परतीच्या पावसाचा तडाखा पिंपरी चिंचवड शहरातील कित्येक ठिकाणी नागरिकांना बसला आहे . अचानक झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी घरात दुकानात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे . द जिम शेजारील गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते.
नवी सांगवी येथील नरेंद्र वाडते यांच्या घरात रात्रीच्या वेळी पावसाचे पाणी येऊ लागल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला . त्यात साई चौक ते फेमस चौक रस्त्याचे काम चालू असल्याने यावेळी पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होऊन अधिक मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहत गल्लीमध्ये शिरले . त्यात सर्व चिखल असल्याने पाणी ओसरल्यावर घर साफ करण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याठिकाणी मागील वर्षी सुद्धा असा प्रकार झाला तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली होती मात्र ती दुरुस्ती न झाल्याने पुन्हा पाण्याच्या घरातील शिरकावास सामोरे जावे लागले . महापालिकेचे संबंधित विभागातील स्थापत्य अधिकारी विजयसिंग भोसले यांच्याशी त्यांनी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने मदत करण्याचे आश्वासन देऊन काम चालू केले आहे . मात्र रस्त्याचे काम पूर्ण होताना अशा समस्यांचा विचार करण्यात यावा असेही नागरिकांचे म्हणणे आहे .
Comments are closed