मुंबई, दि. ( Punetoday9news):-
कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस अंमलदार संध्या शीलवंत यांनी एकाच दिवशी चार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे उत्तरदायित्व पार पाडले होते. या काळात त्यांनी एकूण सहा अंत्यसंस्कार केले. त्यांच्या रूपाने वर्दीतील स्त्रीशक्तीचे दर्शन घडले. त्यांच्या कार्याचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून अभिमान असल्याचे मत व्यक्त केले .
Advt:-
Comments are closed