सोनवणे दाम्पत्यात्याचा समाजापुढे अनोखा आदर्श.

सांगवी, दि. १८ ( punetoday9news):- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्ती प्रमाणे  वास्तविक जीवनात आदर्शवत कार्य करून सोनवणे दाम्पत्याने समाजा समोर एक आदर्श ठेवला आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग ३२ च्या नगरसेविका शारदा सोनवणे व त्यांचे पती हिरेन सोनवणे या दाम्पत्याने  स्वतः पासून प्लाझ्मा दान करून इतरांना आवाहन केले आहे. कोविड मुक्त होऊन एक महिना होताच ठरवल्या प्रमाणे वाय.सी.यम हाँस्पिटलच्या रक्तपेढी मध्ये जाऊन दोघांनी प्लाझ्मा दान केला.  नागरिकांच्या गैरसमजामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत नाहीत. त्यामुळे समाजात प्लाझ्मा दान विषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.  प्लाझ्मा दान केल्याने कुठलाही दुष्परिणाम होत नाही तसेच इतर संसर्ग सुध्दा होत नाही. कोरोनामुक्त तरुण व नागरिकांना नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आवाहन केले की प्लाझ्मा दान करून एक प्राण वाचवा.  आपले समजाबाबतील कर्तव्य पार पाडा.

Advt:- 

Comments are closed

error: Content is protected !!