पिंपरी,दि.१८ ( punetoday9news) :- आजच्या काळामध्ये स्त्रिया ह्या केवळ घर काम करणाऱ्या नसून समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रणरागिनी बनल्या आहेत. स्वतः बरोबरच कुटुंब व समाजाला दिशा देण्याचे काम आज नारी शक्ती करीत आहेत www.punetoday9news.com च्या माध्यमातून आपण अशा नारी शक्तीच्या कार्याचा गौरव लेखणीद्वारे करत आहोत. आपणही आपल्या घरातील परिसरातील अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नारीशक्तीची उल्लेखनीय कामगिरी आमच्या पर्यंत पोहोचवून या उपक्रमात सहभागी होऊ शकतात अशा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माता-भगिनी लेखणीच्या माध्यमातून गुणगौरव करणे हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो.
आज आपण या सदरामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आदिती निकम यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत आदिती निकम या सर्वसामान्य कुटुंबातील नारीशक्ती आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाजा बद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. या कार्याचा मोबदला म्हणून त्यांना चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य हे पदही देण्यात आलेले आहे. त्यानुसार त्या चिंचवड विधानसभा मतदार संघात गरजवंत नागरिकांची मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत . आपल्यापरीने शक्य तेवढ्या नागरिकांना मदत व्हावी ही त्यांची इच्छा आहे त्यानुसार अगदी तळागाळातील जनतेपर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो .
उच्चभ्रू सोसायटीपासून छोट्या झोपडी मध्ये जाऊन स्वतः विविध उपक्रमातून त्या समस्या जाणून समाज सेवा करतात. त्यामध्ये त्यांनी लहान मुलांना कपडे वाटप, अन्न वाटप, फळे वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप अशी विविध कामे केली आहेत. तसेच दिव्यांग मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी ही विशेष प्रयत्न त्या नेहमी करत असतात त्यातून कित्येक मुलांना मदत मिळाली आहे त्यामुळे समाजातील विविध स्थरातून या शक्तीचा गौरव कौतुक रूपातही होत आहे यापुढेही त्या अशाच पद्धतीने कार्य करत राहणार असल्याचे मत आदित्य निकम यांनी व्यक्त केले आहे.
त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे वडील व आमदार लक्ष्मण जगताप यांची भूमिका ही त्यांना काम करण्यामध्ये नेहमी प्रेरणा देत असते असेही त्या म्हणाल्या .त्यांच्या कार्याची दाखल घेत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार हि मिळाला आहे .
Advt:-
Comments are closed