पिंपरी,दि. १८ (punetoday9news) :- कोरोना च्या भीतीने माणुसकी होऊ लागली कमी . असेच काहीसे चित्र आज समाजात बनत चालले आहे असे काही उदाहरणातून दिसू लागले आहे. असेच एक उदाहरण पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी येथे पाहायला मिळाले .  एका कामगाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी मृत्यू झाला होता . पण कोरोनाच्या भीतीने कामगाराचा मृतदेह पाच ते सहा तास घरातच पडून होता. मृतदेहाला कोणीही हात लावायला तयार नव्हतं. अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढाकार घेत मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करत शुक्रवारी विधिवत अंत्यसंस्कार केले . प्रसाद कुमार गुप्ता (४२, बिहार ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

मृत पावलेला कामगार प्रसाद कुमार गुप्ता हा पिंपरीतील महात्मा फुले नगर येथे कुटुंबासह राहत होता . लॉकडाउन झाल्याने गुप्ता कुटुंबाला घेऊन त्याच्या मूळ गावी बिहार येथे गेला होता . त्यानंतर काही दिवसांनी शहरातील परिस्थिती सुधारली. उद्योग, व्यवसाय सुरू झाले, त्यामुळे गुप्ता हा शहरात एकटाच परतला.  गुरुवारी सकाळी त्याचा राहत्या घरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र इतरांना त्याची कल्पना नसून गुप्ता घराबाहेर न आल्याने पहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले .




त्यात कोरोनाच्या भीतीने कोणीही मृतदेहाला हात लावण्यास किंवा बाहेर काढण्यास पुढे येत नव्हते . सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह घरातच पडून होता. अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येऊन सहकारी मित्रांच्या मदतीने मृतदेह  महानगरपालिका पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवला . तिथे शवविच्छेदन केले तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे  समोर आले .

कुटुंबातील सदस्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मृतदेह बिहारला घेऊन जाण्यास किंवा शहरात येण्यास ते असमर्थ होते. त्यामुळे  शुक्रवारी रात्री उशिरा नातेवाईकांची परवानगी घेऊन व्हाट्सअप  कॉलद्वारे शेवटचे अंतिम दर्शन घडवून ननावरे यांनी मयत प्रसाद कुमार गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!