पिंपरी,दि.१८(punetoday9news) :-  पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालयाने कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करत सक्षम कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल भगत कोशारी यांनी पुणे जिल्हा रुग्णालयास  पुरस्कार देऊन गौरविले आहे .

पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा रुग्णालयातील डॉ अशोक नांदापूरकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे यांनी यांनी कोरोना  विभागाचे नियोजन करून  रुग्णालयातील तज्ञ डॉ.किरण खलते यांच्यावर कोरोना विभागाची जबाबदारी दिली होती. त्यानुसार डॉ.किरण खलाटे  यांनी अत्यंत कशोशिने कोरोना विभागाचे अनेक वॉर्ड मध्ये रुपांतर केले. तसेच वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी अधिपरीचारिका प्रमुख नेमल्या.  यामध्ये वैशाली कर्डिले , सुनीता कुंभार, प्रियांका जाधव , इंदू सरवदे, तांबे यांना नियुक्त करून वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी दिली .त्यानुसार नियोजनबद्ध काम अधिसेवीका कार्यालय मार्फत निवेदिता जव्हेरी, मंगल पांढरे व ढोबळे यांनी केले . परिणामी कोरोना रुग्णांवर योग्य उपचार झाले.





अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे .

 

Comments are closed

error: Content is protected !!