सांगवी, दि. १९(punetoday9news):- नवी सांगवी येथील क्रांती चौक मध्ये राहणाऱ्या संगीता कांकरिया यांच्या घरी शनिवारी(दि.१७) चोरट्यांनी चोरी करत तब्बल तेवीस तोळे चार ग्रॅम दागिने चोरले आहेत तसेच रोकडही चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत संगीता अजित कांकरिया (वय 52 नवी सांगवी) यांनी अज्ञात चोराच्या विरुद्ध सांगवी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सांगली पोलीस स्टेशन चे पोलीस याची चौकशी करत आहेत.
दिवसेंदिवस चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याने सांगवी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगोदरच कोरोनाचे संकट त्यात बेरोजगारी वाढल्याने चोरीच्या घटना वाढत आहेत तर दुसरीकडे कष्टाच्या कमाईतून कमावलेले पैसे व दागिने यांच्यावर चोरांच्या नजरा खिळल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण झाले आहे.
त्यामुळे पोलिसांनी तत्परता दाखवत अशा चोरांना अटक करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
Comments are closed