सांगवी,दि.१९ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील युवकांनी प्लाझ्मा दान संकल्प अभियान सुरु केले आहे . आज पिंपरी चिंचवड मधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घाट असली तरी प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या तुलनेत अजूनही कमी आहे . त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनीइतर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे .





त्यानुसार  गणेश जवळकर, दिनेश यादव, शिवराज लांडगे , उदय गायकवाड, गणेश संभेराव या युवकांनी पुढाकार घेत प्लाझ्मा दान संकल्प अभियानाला स्वतःपासून सुरुवात केली.

या युवकांच्या मते हि कोरोना बरे होणारे रुग्णांचे प्रमाण जास्त आहे परंतु प्लाझ्मा दान करणारे कमी आहेत त्यामुळे आजारी रुग्णांच्या नातेवाईक यांची धावपळ उडते त्यासाठी  आम्ही ऐच्छिक प्लाझ्मा दात्यांची नावे नोंदवून गरजू रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत  तरी समाजातील सजग नागरिक म्हणून आपल्या मदतीची अपेक्षा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे .

 

Advertise:-

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!