सांगवी, दि. १९( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथे अज्ञात चोराने २४तोळे सोने व रोकड चोरी गेल्याची घटना घडली होती. त्याचा सांगवी पोलिस स्टेशन पोलिसांनी तत्परतेने तपास करत आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १७ रोजी फिर्यादी संगीता अजित कांकरिया( वय -५२ वर्षे , रा.राजयोग बंगला , क्रांती चौक , कीर्ती नगर , नवी सांगवी ) यांच्या घरातून अज्ञात चोरटयाने २४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ४० हजार रु. रोख रक्कम चोरी केले होते त्यानुसार दिलेल्या तक्रारीवरून सांगवी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४११/२०२० भा.द.बि.कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हा दाखल होताच तपास पथकातील अधिकारी , कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करता घटनास्थळी कोणत्याही प्रकारची छेडछाड दिसुन न आल्याने प्रथमतः घरातील लोकांकडे व घरकाम करणाऱ्या महिलांकडे कसुन चौकशी केल्यानंतर गुन्हयाच्या अनुषंगाने काही उपयुक्त माहिती मिळुन आली नाही . माात्र अधिक चौकशी करता सप्टेंबर महिन्यात दरम्यान एक केअर टेकर म्हणुन मुलगा काम करत असल्याची माहिती समोर आली .तसेच तो मध्येच काम सोडुन गेला असल्याने त्याच्यावर संशय बळावल्याने त्याचा मोबाईल फोन नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन मोबाईल फोनचे लोकेशन तपासले असता ते पिंपरी चिंचवड परिसरात आढळून आले.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी संदीप भगवान हांडे (वय २५ वर्षे, सध्या रा . वाल्हेकरवाडी,चिंचवड, मुळ पिंपरखेडा ता.गंगापुर जि.औरंगाबाद) यास कल्पतरु चौक येथे बोलावून शिताफीने ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्हयातील चोरीस गेलेले २४ तोळे सोन्याचे दागिणे व २० हजार रु. रोख रक्कम असा एकुण ६,१५,००० / – रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम मुददेमाल हस्तगत करण्यात आला. अधिक तपास सांगवी पोलिस करीत आहोत .




सदरची कामगीरी पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ आनंद भोईटे , सहा . पोलीस आयुक्त वाकड विभाग गणेश बिरादार ,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे रंगनाथ उंडे , व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) अजय भोसले , तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके , पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे , पोलीस नाईक कैलास केंगले , सुरेश भोजणे , रोहिदास बोहाडे , पोलीस शिपाई अरुण नरळे , शशीकांत देवकांत , नितीन खोपकर , अनिल देवकर , शिमोन चांदेकर यांनी केली आहे .

Comments are closed

error: Content is protected !!