पिंपरी,दि .२० (punetoday9news):- सध्या लहान मुलांना कोडिंग शिकवा, असे  सांगणारी जाहिरात सतत सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे .  व्हाईटहॅट ज्युनियर नावाच्या कंपनीने केलेली ही जाहिरात आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांनी कोडिंग करणे  शिकून घेतल्यास ते किती फायद्याचे  आहे, सरकारने इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांनी कोडिंग शिकणं अनिवार्य केले आहे अशा  गोष्टी या जाहिरातीत सांगण्यात येतात. पण या जाहिरातींवरून पालकांमध्ये संभ्रमावस्था वाढून याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना स्पष्टीकरण विचारण्यात आले . शिक्षणमंत्र्यांनीसुद्धा याची दखल घेऊन दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना लोकांनी बळी पडू नये, असे  आवाहन केले  आहे.

या प्रकारानंतर सध्या तरी ‘कोडिंग अनिवार्य आहे’ अशा आशयाची जाहिरात दिसणे बंद असले  तरी या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसे  कोडिंग म्हणजे काय? लहान वयातच अगदी सहाव्या वर्षांपासूनच मुलांना कोडिंग शिकवणे  कितपत योग्य आहे? इतक्या लहान वयातच कोडिंग वगैरे अवघड गोष्टी मुलांच्या समोर  ठेवल्यानंतर त्याचा त्यांच्यावर दबाव तर येणार नाही ना? अशा प्रकारच्या चर्चा पालकवर्गामध्ये रंगल्या आहेत.

कोडिंग म्हणजे काय?
आपण संगणक वापरत असताना फक्त बाहेरून सुरू असलेली प्रक्रिया आपल्याला दिसते. पण ही प्रक्रिया घडण्यासाठी जी काही रचना तयार केलेली असते त्याला कोडिंग म्हटले  जाते . ही रचना आपण बाहेरून पाहू शकत नाही.




नवीन शिक्षण पद्धतीत याचा थोडासा उल्लेख आहे. मात्र कोणावरही बंधनकारक नसल्याचे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

कोरोना काळात गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ शाळा बंद आहेत. दरम्यान, अनेक शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. कोडिंग विषय या ‘ऑनलाईन’ शिक्षणाचाच भाग असल्याचा गैरसमज पालकांना झाला. त्यामुळे कोडिंग विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात विचारणा होऊ लागली.

त्याला वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं. “नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने किंवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी अशा प्रकारचा कोणताही निर्णय अद्याप घेतला नाही. पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन शालेय शिक्षणंत्री गायकवाड यांनी केले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!