सांगवी,दि.२० (punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये निर्माण होत असलेल्या  मोबाईल नेटवर्कच्या तक्रारीमुळे ग्राहक मात्र या मोबाईल नेटवर्क कंपन्यांच्या खराब सर्विस बद्दल प्रचंड नाराज होताना दिसत आहेत. जाहिरातींमध्ये मोठमोठे दावे करणाऱ्या सर्वच कंपन्या या प्रत्यक्षात त्या पद्धतीची सर्विस देत नसल्याचे सत्य समोर येत आहे. शहरातील सर्व गल्ल्यांमध्ये खोद कामे करत विविध कंपन्यांनी नेटवर्कचे जाळे पसरवले खरे पण प्रत्यक्षात 4G नेटवर्कच्या नावाखाली मिळत असलेले नेटवर्क हे वास्तविक स्पीड देत नसल्याचे सत्य आहे.

कोरोना मुळे अजूनही कित्येक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करून घेत आहेत तर मुलांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांची ही नेटवर्कच्या कमतरतेने मोठी गैरसोय निर्माण होत आहे.





नवी सांगवी परिसरातील ग्राहकांनाही या अपुऱ्या नेटवर्कचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे आयडिया वोडाफोन या कंपन्यांनी एकत्र येत चांगले नेटवर्क देण्याचा दावा केला होता पण प्रत्यक्षात तो फोल ठरला आहे. जिओने केलेली जाहिरातबाजी सुद्धा प्रत्यक्षात कुचकामी ठरते तर दुसरीकडे एअरटेल कंपनी मोठ्या आवाजात आपली जाहिरात करत असली तरी प्रत्यक्षात मात्र नेटवर्क गायब होत असल्याची तक्रार ग्राहक करत आहेत.

एअरटेल कंपनीचे काही ग्राहक एअरटेल कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले असता ऑफिस मधील अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या रस्ते खोदाईमुळे अडचणी येत असल्याचे कारण पुढे करत हात वर केले तर तसेच कंपनीच्या ॲप वर तक्रार नोंदविण्याचा सल्ला देण्यात आला. काही ग्राहकांनी अगोदरच तक्रार एअरटेल कंपनीच्या ॲप’वर नोंदवली असल्याची माहिती सांगितली मात्र या तक्रारीवर कुठल्याही प्रकारे काम झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

म्हणजे एक प्रकारे पूर्ण क्षमतेच्या नेटवर्क व इंटरनेटचे पैसे कंपन्या घेत असून ग्राहकांना त्या पद्धतीची सर्विस देत नसल्याने ग्राहकांची सरळ सरळ या कंपन्या फसवणूक करत आहेत त्यामुळे अशा कंपन्यांवर कोणाचे नियंत्रण आहे का ? यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित राहतो मात्र यावर प्रशासनाकडूनही  नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!