मुंबई, दि. 20(punetoday9news):- दिव्यांग व्यक्तींमध्ये अंत्योदय योजनेची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता अंत्योदय योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता कैलास पगारे, भा.प्र.से. यांना आमंत्रित करण्यात आले आहे.




या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/9djIARbskuM या लिंकचा वापर करावा. तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या यूट्यूब चॅनलला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advt:-

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!