पिंपळे गुरव, दि. २० (punetoday9news):-  पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे नवरात्रीच्या निमित्ताने पारंपारिकतेला सोडून  पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या नारी शक्तीचा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय बनला आहे. कारण नऊ महिन्याच्या लहान बालिकेच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम पिंपळे गुरव येथील आदिलक्ष ग्रुप च्या वतीने घेण्यात आला.




पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून शहरांमध्ये झाडांचे कमी होत असलेले प्रमाण हा चिंतेचा विषय आहे बालवयातच मुलांना झाडाचे महत्व समजले तर झाडांविषयी आपूलकीची भावना मुलांच्या मनात निर्माण होईल तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.

यावेळी आदिलक्ष गृप च्या महिला सदस्या आदिती निकम ,विद्या कुलकर्णी, मनिषा तेलुरे, नंदा सुळ, वैशाली कांबळे, सुनिता सुरळकर, अनिता राजौरिया, अवनी कुलकर्णी, अंकिता जाधव उपस्थित होत्या.

Comments are closed

error: Content is protected !!