रक्ताच्या नमुन्यांसोबत शोधली जाणार लोक आरोग्यशास्त्र,कोविड चाचणी आणि लक्षण इतिहासाशी संबंधित माहिती.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनातून संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय मराठे यांनी केले नियोजन .
सांगवी , दि.२१(punetoday9news) :- संजय मराठे यांच्या नियोजनातून नवी सांगवी भागात विविध ठिकाणी रक्ताचे नमुने घेण्यात आले या सामाजिक कामासाठी नवी सांगवीतील धडाडीचे कार्यकर्ते शुभम चांद यांनी कर्मचारी डॉक्टरांना मदत केली.
पिंपरीचिंचवड शहरामधून SARS COV-2 IgG अँटीबॉडीच्या या सेरोप्रेलेन्स सर्व्हेसाठी क्लस्टर (क्षेत्रे) निवडली आहेत. प्रत्येक क्लस्टरमधून २५ रक्त नमुने (प्रत्येकी ५मि.ली.) संकलित करुन डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे येथे तपासणीसाठी नेले जात आहे.
रक्ताच्या नमुन्यांसह, लोक आरोग्यशास्त्र, कोविड चाचणी आणि लक्षण इतिहासाशी संबंधित काही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेल्या स्वरूपात गोळा केली जात असल्याची माहिती संजय मराठे यांनी दिली .
Advt:-
Comments are closed