मुंबई, दि.(punetoday9news) :-   एकनाथ खडसे पक्ष सोडणार का ?  राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून शुक्रवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्यस्थितीतील सर्वात मोठी घटना आहे. भाजपमध्ये दुर्लक्षित असलेल्या एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.




२०१६ मध्ये एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच आमदारकीसाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपने तिकीट दिले. मात्र रोहिणी खडसे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि गिरीश महाजन यांच्यावर आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला, असे आरोप केले होते. मे, २०२० मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकींसाठीही खडसे उत्सुक होते. परंतु, त्यावेळीही खडसेंना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नाही.

खडसेंच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे :

१९८८ – कोथळी गावचे सरपंच झाले.
१९९० – मुक्ताईनगर चे आमदार बनले
१९९७ – भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री बनले.
२०१० – विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
२०१४ – भा.ज.प. सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री बनले.
२०१६ – महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला.

एकनाथ खडसे यांनी गेल्या ४० वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठे काम केले  आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलले  जात होते . एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचे  विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिले  होते .

 

Comments are closed

error: Content is protected !!