विद्युत रोषनाईचा आकर्षक विडिओ पहायला विसरू नका.
जेजुरी,दि.२१( punetoday9news):- अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा. यंदाच्या नवरात्री निमित्ताने गडावर श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने विविध रंगांची आकर्षक विद्युत रोषनाई करण्यात आली आहे.भाविकांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेता आले नाही तरी जेजुरीतील नामवंत असे फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर आपल्या छायाचित्रणात द्वारे जेजुरी गडाची ही आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांत पर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. यामध्ये जेजुरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर गिरिष झगडे व मनोज शिंदे यांच्या कॅमेराच्या नजरेतून टिपलेले जेजुरी गडाचे सुंदर छायाचित्र व ध्वनिफीत punetoday9news आपणासाठी घेऊन आले आहे.
लाॅकडाउन मुळे जेजुरी शहराच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून जेजुरीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सर्वसामान्य जनतेला मोठ्या संकटाला समोर जावे लागत आहे. जेजुरी शहराची जवळपास ८० टक्के अर्थव्यवस्था जेजुरी गडावर अवलंबून आहे. येथील पान फूल विक्री, भंडारा, तेल, खेळणी,धातूची भांडी विक्री, पूजा, जागरण गोंधळ, हॉटेल्स, वाहतूक अशा विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे.
नेहमी प्रमाणे साजरा होणारा मर्दानी दसरा कसा होणार भाविकांचे लक्ष लागले आहे. यंदा गडावर नवरात्रीमध्ये मोठ्या स्वरूपात विविध कार्यक्रम नसले तरी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रम चालू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून परंपरेप्रमाणे गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेता आले नाही तरी जेजुरीतील नामवंत अशा फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर यांनी आपल्या छायाचित्रणात द्वारे जेजुरी गडाचे ही आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांत पर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.
गडावरील विद्युत रोशनाई व्हिडिओ ग्राफर च्या नजरेतून गडावरील विद्युत रोषणाई पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
व्हिडिओ १.
व्हिडिओ २.
फोटो, व्हिडिओ सौजन्य:- गिरिश झगडे व मनोज शिंदे.
Comments are closed