पिंपंरी, दि.२२ (punetoday9news) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमरातीसमोर रयत विद्यार्थी परिषदेच्या तरुणांनी पिंपळे निलख येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण ठेकेदाराला भाडेतत्वावर न देता महानगर पालिकेने चालवावे या मागणीसह विविध मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारी सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस कोसळत होता. परंतु ते तरुण उपोषणावरून उठले नाहीत. तसेच पावसात दोघे बसले होते त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत असून त्यांचे कौतुक होत आहे. सचिव रविराज काळे, ऋषिकेश कानवटे अशी त्यांची नावे आहेत.
खासदार, आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या मागण्यासाठी उपोषण आणि आंदोलन करतात. पण, जलप्रदूषण प्रश्नावर रयत विद्यार्थी परिषदेच्या तरुणांनी आवाज उठवला असून विविध मागण्यासाठी तरुण बेमुदत उपोषणाला बसले आहेत. अचानक धो-धो पाऊस कोसळायला सुरुवात झाल्यानंतरही उपोषणाला बसलेले तरुण उठले नाहीत. अर्धा ते एक तास जोरदार पाऊस बरसत होता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तरुणांच्या मागण्या काय आहेत?
१) पिंपळे निलख येथिल जलशुद्धीकरण केंद्र पुर्ण क्षमतेने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेकेदाराकडे भाडेतत्त्वावर न देता स्वत: पालिकेने चालवावा.
२) ८/८/२०२० पासून ८/१०/२०२० पर्यंत सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
३) श्री विनय इंजिनिअरिंग प्रा. ली या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.
४) पिंपळे निलख येथिल जलशुद्धीकरण केंद्रात असणारी बायपासची लाईन पुर्णपणे उखडून टाकावी.
५) या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी म्हणून पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी यांचे निलंबन करण्यात यावे.
आता यावर प्रशाशन काय भूमिका घेणार हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे .
Advt :-
Comments are closed