मुंबई,दि.२३(punetoday9news):- शिवसेना व शिवाजी पार्क एक जुनी परंपरा आहे . यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधनं कायम आहेत. त्यामुळे शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना काळात सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधने कायम आहेत.
त्यानुसार यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. त्यानुसार मेळाव्याचे स्वरुप काय असावं? तो कसा घेतला जावा? यावर चर्चा सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधने कायम आहेत. त्यानुसार शिवसेनेचा शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिली आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे.
शिवसेनेची ५३ वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते. यासाठीच हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल होतात.
राज्यात नोव्हेंबर २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी जास्त महत्वाचा आहे.
Comments are closed