- दिल्लीतील सहकाऱ्यांनी दिला एनसीपीत जाण्याचा सल्ला.
- कुठल्याही अपेक्षेशिवाय पक्षप्रवेश केल्याचे मत केले व्यक्त.
मुंबई, दि. २३( punetoday9news):- एकनाथ खडसे यांनी मुंबईमधील उपस्थित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच भारतीय जनता पार्टीवर जोरदार प्रहार केला.
एकनाथ खडसे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की गेली चाळीस वर्षे मी माझ्या पक्षाची अविरतपणे सेवा करूनही माझ्यावर अन्याय करण्यात आला. अनेक खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देण्यात आला इथून पुढील काळात जळगाव तसेच इतर शेजारील जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा झेंडा वरचढ राहील असे कार्य करण्यात येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा आनंद होत आहे. मनावरील ओझे कमी होऊन डोके हलके झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. तसेच नियमबाह्य काम करून कुणी किती भूखंड खाल्ला आहे तेही लवकरच जाहीर करणार असल्याची भूमिका ही त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ खडसे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये आल्यामुळे खानदेशात पार्टीची ताकद वाढण्यास मदत होईल त्यांचा अनुभवही पार्टीसाठी फायद्याचा ठरेल. – शरद पवार
Advt :-
Comments are closed