पिंपरी,दि.२३(punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मिळकतींवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते . पिंपरी चिंचवड शहरातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांची नोंद असलेल्या मिळकतींचा सरसकट संपूर्ण वार्षिक मिळकत कर माफ करणेत यावा तसेच ७०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामाची नोंद असलेल्या मिळकतींवर ६०% मिळकत कर आकारणी करुन उर्वरित ४०% वार्षिक मिळकत करामध्ये पूर्णपणे सवलत देणेबाबत तसेच संरक्षण दलाचे माजी सैनिक , शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींच्या नावे असणाऱ्या मिळकतींचा वार्षिक मालमत्ता कर पूर्णपणे माफ करणेबाबत आणि शहरातील मिळकतधारकांना दिलासा देणेबाबतची मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी बोलताना केली .





पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत . कोरोना विषाणूचे संकट व लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग , व्यवसाय हे पूर्वपदावर न आल्याने अनेक गोरगरीब कष्टकरी , कामगार व खाजगी नोकरदार वर्गास जीवन जगण्याची भ्रांत पडलेली आहे . सध्या शहरातील बऱ्याच नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती अगोदरच खालावलेली आहे. त्यामध्ये भरीस भर म्हणजे महापालिकेमार्फत मिळकत धारकांना मिळकतकराची बिले देण्यात येत आहेत . शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांकडून वार्षिक मिळकत कर माफीसंबंधी मागणी करण्यात येत होती . तसेच संरक्षण दलाचे माजी सैनिक , शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींच्या नावे शहरात जवळपास ३५०० पेक्षा जास्त मिळकतीं आहेत . त्याची दखल घेऊन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनास सुचना केल्या . तसेच राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!