मुंबई,दि.२४( punetoday9news):- महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेल्या भागात जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना ठाकरे सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली . मात्र ही मदत अपुरी असून झालेले नुकसान पाहता अधिक रक्कम देणे गरजेचे आहे .एवढ्याने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही असे आता राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा तसेच राज्यातील विरोधी पक्षानेही त्यासाठी पुढाकार घ्यावा . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले . मात्र ही रक्कम समाधानकारक नाही.
शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जमिनी वाहून गेल्या आहेत, विहिरी ढासळल्या आहेत. शेतकऱ्याला उभे राहण्यासाठी तेवढ्याने मदत होणार नाही. आता राज्यातल्या विरोधी पक्षाने जबाबदारी घेऊन केंद्राकडे मदतीसाठी आवाहन करावे एवढंच नाही तर राज्य सरकारनेही केंद्राकडे मदत मागावी. ज्या तातडीने बिहारला मदत देण्यात आली त्याच तातडीने महाराष्ट्रालाही मदत मिळावी अशीही अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
Advt :-
Comments are closed