पिंपळे गुरव ,दि.२४ (punetoday9news) :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे माता रमाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आदिशक्ती ग्रुप तर्फे जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला . आज समाजात नारी शक्ती विविध भूमिकेत कार्यरत आहे. घरामध्ये आई , बहीण , पत्नी ते डॉक्टर ,पोलीस , इंजिनिअर , वकील आदी विविध क्षेत्रात महिला ह्या मोलाची कामगिरी करत आहेत .
आज कोरोना काळातही महिला विविध भूमिकेतून समाजास आदर्शवत कार्य करत सामाजिक भूमिका बजावत आहेत .अशा कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांचे आभार मानणे आपले कर्तव्य आहे .
त्या नारी शक्तींच्या सन्मानार्थ उपक्रम राबवून पिंपळे गुरव येथील महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.करुणा कासारे तसेच परिचारिका भाग्यश्री कोठेकर, कविता जाधव, चंद्रभागा कोकाटे, रोहिणी गायकवाड ह्यांना अभय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमा मध्ये संस्थेच्या अध्यक्षा रतिका शर्मा, सचिव नितीन सोनवणे, भागीरथी हुकमते व आदिशक्ती ग्रुप च्या अध्यक्षा अदिती निकम सहभागी होत्या.
Advt:-
Comments are closed