बीड,दि २५ (punetoday9news) : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा उद्या ऑनलाइन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावरती होणार आहे. भगवानगडावर दसऱ्या दिवशी राजकीय संदेश देण्याची परंपरा होती. मात्र, भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या सोबत वाद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन वर्षांपासून भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावमध्ये भगवान भक्तिगड उभा केला आहे. याच ठिकाणी दसऱ्या दिवशी पंकजा मुंडे भगवान बाबाचे दर्शन घेऊन याच ठिकाणी त्या दसरा मेळावा घेत असतात.




यावर्षी हा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला न येता घरी राहून भगवान बाबांची पूजा करून हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केला आहे. तर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा ठेवला आहे.



यावर्षी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत. भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन प्रकाश आंबेडकर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासमोर आव्हान उभं केलं आहे.

Comments are closed

error: Content is protected !!