व्यापाऱ्यांनी कमवले, तर निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्याच्या पदरी निराशाच. 
.
.
सांगवी, दि.२५( punetoday9news):- कोरोनाच्या भीतीने यंदा शेतकरी प्रत्यक्षात हातविक्री वर फुले विकण्यासाठी शहरात न फिरल्याने व्यापाऱ्यांनी मात्र झेंडूच्या फुलाचे सोने केले.  तब्बल चारशे ते पाचशे रु. किलोने झेंडूची फुले विकली गेल्याने कोरोनाच्या मंदीतही व्यापाऱ्यांनी चांदी नव्हे तर सोने कमवले. 
  त्यामुळे यंदाचा दसरा हा फुलविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी मोठी संधीच घेऊन आल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात बनले आहे. मध्यम वर्गीय ग्राहकांच्या मते प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा मिळत असेल तर १००रू.  ऐवजी २०० रूपयांतही फुले घेतली असती. मात्र इथे प्रत्यक्षात कष्टकरी शेतकरी उपाशी व व्यापारी मात्र तुपाशी असे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून फुले घेताना मध्यमवर्गानेही थोडा आखडता हात घेतला.


दसऱ्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलांसह आपट्याच्या पानांना मोठी मागणी असल्याने शहरातील मार्केटमध्येे विविध ठिकाणी फुले खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. किरकोळ बाजारात ४०० ते ५०० रुपये किलो दर मिळाल्याने यंदा झेंडूच्या फुलांनी चांंगलाच ‘भाव’ खाल्ला.

पण प्रत्यक्षात वस्तुस्थितीची चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले की झेंडूच्या सोन्याची झळाळी मात्र फक्त व्यापाऱ्यांच्या पुरतीच मर्यादित होती शेतकऱ्यांकडून 50 ते 150 रुपये किलो दराने घेतलेला झेंडू शहरांमध्ये तब्बल चारशे ते पाचशे रुपये किलो दराने विकून व्यापाऱ्यांनी दसऱ्याच्या निमित्ताने विक्रमी दराचे सीमोल्लंघन केले.
प्रतिक्रिया:-

यंदा बाजारात चारशे ते पाचशे रुपये झेंडूच्या फुलांना किलोमागे दर सांगण्यात येत असल्याने मध्यमवर्गीय नागरिकांनी सण कसा साजरा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या फायदा व्हावा.  यावर प्रशासनाचे कसलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. –  संजीवनी पुराणिक, सामाजिक कार्यकर्त्या.
.
.
यंदा अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे मोठे नुकसान झाले असून बहुतांशी झेंडूची फुलशेती नुकसानग्रस्त झाली आहे. त्यामुळे यंदा जेजुरी परिसरातूनही दरवर्षीप्रमाणे झेंडूच्या फुलांचे उत्पादन निघाले नाही.  –
कुंडलिक झगडे, युवा शेतकरी.
 

Comments are closed

error: Content is protected !!