जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारतात फक्त जाहिरातबाजीच. 

मुंबई, दि. २६ ( punetoday9news):- संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे असल्याचे काही रिपोर्ट्स समोर आले आहेत. मोबाईल डेटा स्पीड लिस्टमध्ये भारत जगात 131 व्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश भारताच्या पुढे आहेत.

 

डेटा स्पीड ट्रॅक करणारी कंपनी Ookla च्या Speedtest Global Index सप्टेंबर 2020 च्या रिपोर्टनुसार भारतात सरासरी मोबाइल डाऊनलोड स्पीड हा 12.07Mbps इतका आहे आणि अपलोड स्पीड 4.32 Mbps आहे. तर लेटेन्सी रेट 52ms इतका आहे. जगभरातील सरासरी मोबाईल डेटा स्पीड हा 35.26 Mbps (डाऊनलोड स्पीड) इतका आहे, अपलोड स्पीड 11.22 Mbps आणि लेटेन्सी रेट 42ms इतका आहे.





मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत दक्षिण कोरिया हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियामध्ये डाऊनलोड स्पीड 121Mbps, सरासरी अपलोड स्पीड 18.81Mbps आणि लेटेन्सी रेट 34ms इतका आहे. फिक्सड लाइन ब्रॉडबँडच्या बाबतीत दक्षिण कोरिया 14 व्या स्थानी आहे. यात द. कोरियात 155.39Mbps डाऊनलोड स्पीड आणि 147.89Mbps इतका सरासरी अपलोड स्पीड मिळतो. तर तिथला लेटेन्सी रेट 22ms इतका आहे.





Comments are closed

error: Content is protected !!