खबरदारी, काळजी घेऊनही कोरोनाची लागण .
मुंबई,दि.२६ (punetoday9news):- कोरोना काळात नियमित आणि वेळेत कामात तत्परता दाखवत यंत्रणा नियंत्रणात ठेवणारे मंत्री म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार. संपूर्ण मंत्रालय ओसाड असताना सकाळी नऊ वाजताच मंत्रालयात येऊन काम सुरु करणारे अजित पवार कोरोना काळात मात्र विशेष काळजी घेत होते असे असतानाही आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आलं. अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्वतः क्वारंटाइनमध्ये होते.
बैठकांना गर्दी होऊ नये म्हणून अजित पवार यांचे कार्यालय विशेष काळजी घ्यायचे. त्यांच्या कार्यालयात मशीन आणि सॅनिटायझर वापरणे हे बंधनकारक होते. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी याकडे विशेष लक्ष ठेवून असायचे. अगदी कार्यालयात येणारे कागद, फाईल देखील सॅनिटाईज करायला विशेष मशीन लावण्यात आले होते.
पुण्यातही एका कार्यक्रमात अधिकारी माहिती देताना मास्क काढून बोलू लागताच मास्क लावण्याचा सल्ला देणारे अजित पवार इतरांसाठी आदर्शवत काळजी घेत नियमांचे पालन करत होते. पण तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंता पसरली आहे .
Comments are closed