मुंबई, दि.२६( punetoday9news) :- राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले आहेत. आता प्रती तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहेत.
त्यामुळे नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार आता चाचण्यांसाठी ९८० , १ हजार ४०० आणि १ हजार ८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत.
तर, ४ हजार ५०० रुपयांवरुन ९८० रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
करोना चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी खालील तीन टप्पे
1. प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल.
2. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी १ हजार ४०० रुपये
3. रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी १हजार ८०० रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे.
Comments are closed