सांगवी, दि. २७ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड परिसरातील लाॅकडाऊनच्या काळामध्ये कोरोना महामारीच्या विरोधात पोलीसांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याबद्दल पोलीस फ्रेंन्डस् वेलफेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड शहर संघटक विनोद . एस. सुथार यांच्या वतीने सांगवी पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी आणि ९० कर्मचारी यांना “कोविड-१९ योद्धा” सन्मानपत्र व वाफ मशीन देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन चे संस्थापक/ अध्यक्ष गजानन चिंचवड़े, नगरसेवक नवनाथ जगताप तसेच सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ बापु उंडे ,पोलीस निरीक्षक गुन्हे अजय हनुमंत भोसले, पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस उप निरीक्षक गोविंद चव्हाण, महिला पोलीस उप निरीक्षक हेमा साळुंके, पोलीस हवालदार गिरीश राउत, पोलीस नाईक चंद्रकांत भिसे, दिपक पिसे व इतर कर्मचारी तसेच युवक अध्यक्ष शुभम चिंचवड़े, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखिल येवले,हवेली तालुका उपाध्यक्ष उमेद सुथार, सामाजिक कार्यकर्त्ता प्रविण खन्ना, महेश काळे, दत्तात्रय गुरव, अभय दाभाडे, आनंद कर्णावट, फारुख खान, चंद्रवीर सुथार आदि उपस्थित होते.
Comments are closed