पुणे, दि. २७ (punetoday9news):- लाॅकडाऊनच्या काळामध्ये कोरोना महामारीच्या विरोधात पोलीसांनी जीवाची पर्वा न करता, केलेल्या कार्याबद्दल पोलीस फ्रेंन्डस् वेलफेअर असोसिएशन हवेली तालूका उपाध्यक्ष उमेद सुथार यांच्या वतीने , दत्त नगर पोलीस चौकी, पुणे येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना “कोविड-१९ योद्धा” सन्मानपत्र व वाफ मशीन देऊन सन्मानित करण्यात आले तसेच महानगरपालिका कामगारांना सॅनिटायझर, मास्क देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन चे संस्थापक/ अध्यक्ष गजानन चिंचवड़े, दत्त नगर पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष रमेश कवठेकर , सहा. पोलीस फौजदार अनिल संभाजी शिंदे, काॅन्स्टेबल अजित गजानन कोकरे, नितिन देवीदास धोत्रे, पोलीस नाईक नेताजी तानाजी कांतागले, कांस्टेबल संदीप संपत मांडगे व इतर कर्मचारी तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखिल येवले, पुणे शहर अध्यक्ष जितेंद्र निजामपूकर, पुणे शहर युवक उपाध्यक्ष रुपेश अग्रवाल, कसबा विधानसभा अध्यक्ष विशाल मोरे, पुणे शहर महिला संपर्कप्रमुख उज्वला गौड , सभासद उगाराम, अर्जून सुथार, सुजाराम माली सामाजिक कार्यकर्ते जाधव, नंदकुमार कोकाटे आदि उपस्थित होते.
Comments are closed