मुंबई, दि. २८ (punetoday9news):- प्रत्येक वेळी बिग बॉस मध्ये काही न काही वादग्रस्त घडत असतंच असा प्रेक्षकांचा अनुभव आहे . त्यात काही स्पर्धक जाणीवपूर्वक प्रसिद्धी साठी वादग्रस्त विधाने करून स्वतःला वादात अडकवतात का असाही प्रश्न उपस्थित केला जातो. यंदाच्या सीजन मध्ये हि जान कुमार सानू याने आपल्याला मराठी भाषेची चिढ येते असे वादग्रस्त विधान करून स्वतः सहित संपूर्ण बिग बॉसला वादाच्या भोवऱ्यात घेचुन घेतले आहे .




याला विरोध दर्शविताना मनसे व शिवसेनेने या प्रकरणात उडी घेतली असून बिग बॉसला  इशारा देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला बिग बॉस शो मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार आमदार प्रताप सरनाईकांनी कलर्स वाहिनीला अल्टिमेटम दिले आहे.  जान कुमार सानूने  मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल असा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडाओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे.




तर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटले  आहे की, जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय .

त्यामुळे आता या प्रकरणावरून जान कुमार सानू यावर बिग बॉस टीम  कारवाई करणार कि नाही यावर पुढील घडामोडी पाहायला मिळणार आहेत .

Comments are closed

error: Content is protected !!