नाशिक,दि.२८ (punetoday9news):- महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची चर्चा सर्वत्र असल्याने यावर शरद पवार यांना प्रश्न विचारता त्यांनी सांगितले कि प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असे बोलले जाते.
उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला होता. यावर नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
“कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच सांगत असतो. त्यात काही नवीन नाही. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्दत आहे. त्याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही,” असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
Comments are closed