पुणे जिल्यात एकाच दिवसात दोन घटना घडल्याने नागरिकांत खळबळ.

 

सासवड,दि.२८ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड येथे काळेवाडी मध्ये कचरा पेटी मध्ये (दि.२८ बुधवार ) नवजात अर्भक सापडल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे  आजच (दि.२८ बुधवार ) पुणे जिल्ह्यातील आंबोडी येथे अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे टळला. पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे हा प्रकार घडला. सासवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोडी येथील शिवारात दुचाकीवरून आलेले दोन तरुण एका नवजात अर्भकाला जिवंत पुरणाचा प्रयत्न करत होते. सुदैवाने या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पहिल्यानंतर त्यांनी त्या तरुणाला हटकले. त्यानंतर या तरुणांनी अर्भक तिथेच सोडून पळ काढला आहे. हे अर्भक आता सुरक्षित असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी जेजुरी येथे पाठवले आहे.

येथील तपासणी नंतर या अर्भकाला पुणे येथे ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण डी.एस.हाके करीत आहेत.




Comments are closed

error: Content is protected !!