मुंबई, दि. २९ (punetoday9news):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे ही भेट होणार आहे. मात्र लोकहिताच्या प्रश्नांसाठी राज ठाकरे राज्यपांशी चाररच करतील असे बोलले जात होते .त्यामध्ये मंदिर उघडणे , वाढीव वीजबिल , अकरावी प्रवेश,  दूध, कांदा प्रश्न, मराठी भाषेचा प्रश्न,मायक्रोफायनान्स कंपन्या सक्त वसुली या प्रश्नावर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती  . मात्र फक्त वीजबिलाच्या प्रश्नास महत्व दिल्याचे दिसून येत आहे.




शपथ विधी सोहळ्यापासून राजभवन नेहमीच चर्चेत राहिले आहे . नुकतेच कॉफी टेबल बुक वरून खुद्द शरद पवार यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले आहे .त्यात त्यांनी जनराज्यपाल शब्दावर लक्ष करत टीका केली आहे . त्यामुळे आत आजच्या या राज ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याच्या भेटीत काय चर्चा होते यावर सर्वांचे लक्ष लागले होते  .



भेटींनंतर  राज ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले लोकांना वाढीव वीजबिले आली आहेत , त्यात अनेक तक्रारी आल्या होत्या . वीजबिल कमी करता येऊ शकतात .मात्र अंतर्गत टोलवाटोलवी मध्ये हा प्रश्न टाळला जात आहे . राज्यपाल म्हणाले शरद पवारांची भेट घ्या . लवकरच शरद पवारांची भेट घेणार. इतर प्रश्नांवर बोलण्याचे मात्र त्यांनी टाळत उत्तर दिले कि प्रश्न खूप आहेत मात्र त्यावर सरकारने लवकर योग्य भूमिका घेतली पाहिजे. 

Comments are closed

error: Content is protected !!