पॅरिस दि .२९  (punetoday9news) :- फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मँक्रोन यांनी बुधवारी ( दि.२८ ) पासून  पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात कोरानाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण या काळात शाळा आणि काही कामाची ठिकाणे खुली राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा नवीन लॉकडाऊन महिन्याभराच्या काळासाठी असेल असेही त्यांनी सांगितले.




सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या संक्रमणामुळे देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. त्याला आळा घालण्यासाठी फ्रान्समध्ये या आठवड्यापासून पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात येणार आहे असे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मँक्रोन यांनी बुधवारी देशाला संबोधन करताना सांगितले.




“फ्रान्सवर कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असेल” असे इमॅन्युअल मँक्रोन यांनी त्यांच्या संबोधनात म्हटले आहे.

मंगळवारी एकाच दिवसात कोरोनामुळे ५२० रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण घालायचे असेल तर शुक्रवारपासून देशात लागू होणारा लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed

error: Content is protected !!