स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष आहिरे यांचा ईशारा.
नाशिक दि.२९ (punetoday9news):- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या कांदा व्यापाऱ्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच प्रसिद्धी पत्रकातून जाहिरपणे इशारा दिला आहे कि कांदा लिलाव तात्काळ सुरु करावा .
तसेच सांगितले आहे कि ,नाशिक जिल्ह्यात कांदा मार्केट लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचा कांदा माल साठवणूक क्षमता संपली असल्याने कांदा सडत आहे आता कुठे तरी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले होते पण शासनाने जाचक अटी घालून दिल्याने व्यापारी वर्गाने कांदा लिलाव बंद ठेवले आहेत पण व्यापारी वर्गाचा कांदा गाड्या भरून सुरळीत पणे बाहेर विक्रीसाठी जात आहे मार्केट बंद असल्याने यांच्यात शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होत आहे पुढे शेतकऱ्यांचा दीपावली सण येत असल्याने मुलाबाळांना खरेदीसाठी किंवा घरी थोडंफार गोडधड करून पोराबाळाना खाऊ घालू या अपेक्षेने शेतकरी असतांना शासनाच्या जाचक अटी मुळे व्यापारी वर्गाने कांदा लिलाव बंद पाडले आहेत आमचा शासनाला व व्यापाऱ्यांना जाहीर इशारा आहे की वेळ पडली तर यावर्षी दीपावली चटणी भाकरी करून खाऊन साजरी करू.
दि. १ नोव्हेंबर सोमवार पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाने कांदा लिलाव सुरळीत पणे चालू न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना ,दि.२ नोव्हेंबर मंगळवारपासून नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही व्यापाऱ्यांचा कांदा माल जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाहीत याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामास व्यापारी व प्रशासनाने तयार रहावे.
Comments are closed