देहूगाव,दि. ३०(punetoday9news):- आपण दिवाळी साजरी करताना आपल्या छोट्याशा प्रयत्नातून दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य करू शकता .त्यासाठी वात्सल्य दिव्यांग (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले असून आपल्या सकारात्मक  जोड मिळाल्यास खऱ्या अर्थाने दिवाळी चा सण आनंदाचा बनेल.  आश्रमामध्ये २२ विशेष निरागस मुले आहेत, संस्थेला सरकारी कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही, सर्व खर्च समाजातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने चालतो, तरी दिवाळी निमित्याने मुलांनी पणती रंगवून पॅकेट बनवल्या आहेत, आपण ही पणती खरेदी करून या निरागस मुलांच्या संगोपनासाठी एक मोलाची मदत देऊ शकता,तसेच आपण जेथे काम करता कंपनी , ऑफिस , सोसायटीमधील व्यक्तीना पणती घेण्यासाठी सांगू शकता त्यामुळे पण तुमची मदतच होईल.  ६ पणत्याचे पॅकेट – ८०/-  ऑर्डर देऊन सहकार्य करू शकता.

वात्सल्य दिव्यांग (मतिमंद) मुलांची निवासी शाळा / कार्यशाळा.
पत्ता- येलवाडी रोड, देहूगाव
संस्थेचा मो नं -: 9922221390/
9011961116
Website login – www.vatsalyapune.com





Comments are closed

error: Content is protected !!